Tag: chakan crime

पोलीस हवालदार योगेश ढवळे यांचे अपघाती निधन 
क्राईम

पोलीस हवालदार योगेश ढवळे यांचे अपघाती निधन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : हवालदार पदावर कार्यरत असलेले योगेश ढवळे (वय ४०) यांच्या दुचाकीला हायवा वाहनाने धडक दिल्याने त्यांचे अपघाती निधन झाले. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास चाकण येथे घडली. ते चाकन वाहतूक विभागात कर्तव्यावर होते. मिळालेल्या माहितीनुसार, ढवळे (Yogesh Dhawale) यांना आज (दि. ०८ ऑगस्ट २०२३) चाकण वाहतूक विभागाच्या अंतर्गत माणीक चौक येथे सकाळी आठ ते रात्रौ नऊपर्यंत कर्तव्यास नेमण्यात आले होते. ते सकाळी दहाच्या सुमारास पंचप्रण शपथ घेण्याकरीता ते त्यांचे मोटार सायकल (क्रमांक एम.एच.१४ सी.एफ. ६४८०) वरुन चाकण वाहतूक विभागाकडे येत असताना एच.पी. पेट्रोल पंपासमोर हायवा (क्र. एम.एच. १४ जे.एल. ९९३६) वरील चालकाने त्यांचे मोटार सायकलला धडक दिल्याने त्यामध्ये पो. हवालदार ढवळे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. ...
महेंद्रा ओक्सीटॉप कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल
क्राईम

महेंद्रा ओक्सीटॉप कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

चाकण, ता. 9 : वाकी खुर्द येथील महेंद्रा ओक्सीटॉप कंपनीच्या मालकावर फसवणूक व भारतीय ट्रेड मार्क अधिनियमानुसार चाकण (Chakan) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. महेंद्र गोरे (पत्ता. गेट नं 124, जाधव वस्ती, पुणे नाशिक हायवे, वाकी खुर्द, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या महेंद्रा इंटरप्रायजेस ही कंपनी महेंद्रा ओक्सीटॉपचे लेबल लावून उत्पादित करत असलेल्या बाटलीवर फिर्यादी यांची माणिकचंद ऑक्सीरिज सारखे लेबल (अक्षरांची साईज फॉन्ट व अक्षरांची ठेवन कलर) त्याचे मिनरल वॉटर बाटलीवर भारतीय ट्रेड मार्क विभागाची कुठलीही परवानगी न घेता लेबल टिकटवत असे. या बाटलीची बाजारात विक्री करून ग्राहकांची फसवणूक करत आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक डेरे करत आहेत. ...