Tag: Radhesham goshala

काळेवाडीतील राधेश्याम गोशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील राधेश्याम गोशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

काळेवाडी : येथील राधेश्याम गोशाळेत श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी मुलांनी शिवरायांवर भाषणे, गीते, पोवाडे सादर केली. त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर, उमेश गुंड, श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या संस्थापिका समिता समीर सुतार, राधेश्याम गोशाळेचे संचालक भगत गुरनानी, प्रकाश मूलचंदानी यांच्यासह मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच सरदार व मावळ्यांची वेशभूषा करून शिवचरित्र सादर केले. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. या कार्यक्रमाला तात्या पालकर यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, पालकर यांच्या हस्ते काळेवाडीतील महाराज उदयन...