बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : संवाद व्यासपीठ संस्थेच्या वतीने गुणवंतांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. थेरगाव येथील एबीसी निर्माण इमारतीच्या हॉलमध्ये शनिवारी (ता. २) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संचालक हरीश मोरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
संवाद व्यासपीठ ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सुसंवाद साधण्याचे किंवा भाषण कशा पद्धतीने करायला हवे याचे प्रशिक्षण देत असते. आजवर या संस्थेमधून हजारो लोकांनी प्रशिक्षण घेतले आहे. आणि त्याचा फायदा त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. याच संस्थेमधून अशाच प्रकारे प्रशिक्षण घेऊन गेलेल्या अनेक गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सतीश काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रोहिदास धुमाळ उपस्थित होते. संवाद व्यासपीठ भाषण वर्गाच्या वतीने ज्योती निंबाळकर, मनिषा गटकळ, निर्मला माने, सुवर्णा वाळके, सार्थक गांधी, अक्षदा जाधव, आकाश जाधव, सुप्रिया कवडे, संजय कलाटे, सुभाष साळुंखे, बळीराम खंडागळे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिष मोरे यांनी केले, तर करिष्मा बारणे यांनी सुत्रसंचालन केले. बाळासाहेब मुळे यांनी आभार मानले.