कौतुकास्पद : वाढदिवसाचा खर्च टाळून दोन भावंडांनी कोकण पुरग्रस्तांसाठी दिली मदत

कौतुकास्पद : वाढदिवसाचा खर्च टाळून दोन भावंडांनी कोकण पुरग्रस्तांसाठी दिली मदत
  • सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तापकीर व विवेक तापकीर यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

पिंपरी चिंचवड (लोकमराठी) : पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, या मानवतेच्या भावनेतून काळेवाडीमधील व्यंकटेश्वरा मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत राजाराम तापकीर व पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे विवेक मल्हारी तापकीर या भावंडांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत, तो निधी कोकण पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला.

माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर यांच्या सहकार्याने पवना हेल्थ क्लबचे सदस्य महेश पवार, मंगेश कदम यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते मदतनिधी सुपुर्त करण्यात आला.

यावेळी ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर , डाॅ. अजय जाधव, मनोज शिंदे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नरेश खुळे, दिपक पंचबुध्दे, रामदास कर्वे, नवनाथ तापकीर , रूपेश तापकीर, बाळू भावसार, कृष्णा दारकुंडे, मारुती दाखले, राजू खांदवे, युवराज नखाते, अमोल तेलंगे, किरण केदारी, शरद गुरव, जगदीश निकम, अतुल बलकवडे, मानव गवई तसेच व्यंकटेश्वरा मित्र मंडळांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, तापकीर भावंडांनी घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून त्यांचा आदर्श घेऊन आपल्या लोकांच्या मदतीसाठी इतरांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांनी यावेळी केले आहे.