सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत नामफलकाचे अनावरण

सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत नामफलकाचे अनावरण

पिंपरी : मिलिंद नगर पुनर्वसन प्रकल्प टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन या ठिकाणी तीन रस्ते एकञ येणाऱ्या परिसराला राजे सम्राट अशोक चौक असे नामकरण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सदर चौकाला राजे सम्राट अशोक यांचे नाव देण्याकरिता धम्मदिप प्रतिष्ठाण तथा भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी प्रयत्न केले आहे. व तसा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने नामफलक लावण्यात आला आहे.

नामफलकाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. राजे सम्राट अशोक यांच्या नामफलकाला संत गाडगेबाबा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष कैलास परदेशी यांनी पुष्पहार अर्पण केला व सुरेश गायकवाड यांचा सत्कार कैलास परदेशी यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राहुल वडमारे व कैलास परदेशी यांनी केले होते. अध्यक्ष राहुल वडमारे यांनी सम्राट अशोक यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले तसेच या चौकाला राजे सम्राट अशोक यांचे नाव देण्याचे कारण व महत्व सांगितले.