सोमनाथ दादा तापकीर युवा मंचतर्फे महिलांना ‘गाय-वासरू’ची मूर्ती भेट

सोमनाथ दादा तापकीर युवा मंचतर्फे महिलांना 'गाय-वासरू'ची मूर्ती भेट

काळेवाडी : दीपावलीचा पहिला दिवस वसुबारस, या निमित्ताने सोमनाथ दादा तापकीर युवा मंचच्या वतीने गोमतेच्या पूजनाचा कार्यक्रम येथील भारत माता चौकात आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील असंख्य महिलांनी याचा लाभ घेतला. गोमातेच्या पूजनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व महिलांना प्रतिमात्मक गाय-वासरू मूर्ती व समई सप्रेम भेट देण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर, कयूम शेख, शहाजीलाल आत्तार, राहुल यादव, दौलत पवार, सिद्धेश्वर फसले, अवि गुंटे, निलेश पवार प्रवीण झांजे, सुरज पवार, अजय वर्मा, किरण लोंढे, प्रशांत सोंडकर, कुणाल शिंदे, अशोक शेळके, अजित धारूरकर, प्रशांत कदम, राजुशेठ पवार, मोहन तापकीर, रुपेश तापकीर, भरत दोषी, मोहन चव्हाण, संतोष मुळीक, विकास गुंड यांच्यासह ओम साई ग्रुप आणि सोमनाथ दादा तापकीर युवा मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयोजक सोमनाथ तापकीर म्हणाले की, हिंदू संस्कृतीनुसार गोमतेच्या पूजनापासून म्हणजेच वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरवात होते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे येथील महिलांना इच्छा असूनही गोमतेचे पूजन करता येत नाही. याचाच विचार करून आम्ही विशेषतः महिलांसाठी गोमातेची पूजा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसेच याठिकाणी आलेल्या सर्व महिलांना मंचच्या वतीने प्रतिकात्मक गाय-वासरूची मूर्ती भेट म्हणून दिली आहे. या सणाच्या माध्यमातून गोपूजनाबरोबरच गोरक्षण करणे हीदेखील काळाची गरज असल्याचे, तापकीर यांनी यावेळी सांगितले.