भाजप नेत्याच्या घरातून 17 बॉम्बसह 111 काडतुसे जप्त

भोपाळ : आगामी लोकसभेच्या अनुशंगाने मध्यप्रदेश पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान भाजप नेता संजय यादव यांच्या घरावर धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 10 पिस्तुल आणि 111 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रविवारी (दि 31 मार्च) करण्यात आली.

भाजप नेत्याच्या घरातून 17 बॉम्बसह 111 काडतुसे जप्त

मिळालेल्या माहतीनुसार, पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान पोलिस अधीक्षक यांगचेन डी. भुटिया यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार, संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी या धाडीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संजय यादवविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संजय यादव यांच्यासोबत त्यांचा सहकारी गोपाळ जोशी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, याप्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.