बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
मोशी : मोशी प्राधिकरण मधील संत नगर सेक्टर क्रमांक ४ येथील नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी होत असलेली अडचण पाहून त्या ठिकाणी एक आठवडी बाजार सुरू करण्याची संकल्पना येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज पवार यांना सुचली आणि म्हणून येथील नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी येथे आठवडी बाजार सुरू करण्याचे ठरवले.
संघर्ष संस्था प्रतिष्ठान संस्थापक पंकज पवार आणि वरद विनायक फार्मसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी ते थेट ग्राहक” या योजनेअंतर्गत आठवडे बाजार सुरू करण्याचं ठरवलं.
दिनांक 07 एप्रिल 2022 रोजी संत नगर सेक्टर नंबर 4 मोशी प्राधिकरण श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आठवडे बाजार चालू करण्यात आला. संत नगर सेक्टर 4 व 6, गंधर्व नगरी, जय गणेश साम्राज्य या ठिकाणावरील नागरिक, महिला या आठवडी बाजाराचा फायदा होणार आहे. आणि परिसरातील सर्व महिला भगिनींना याचा लाभ घेता यावा व स्वस्थ ताजा स्वच्छ भाजीपाला फळे या ठिकाणी मिळावेत हा हेतू पंकज पवार व संघर्ष संस्थेचा आहे.
या उद्घाटनाप्रसंगी कामगार नेते सचिन लांडगे, माजी शिक्षण सभापती विजू लोखंडे, कामगार नेते हनुमंत लांडगे, कामगार नेते दत्तात्रय जगताप, नगरसेविका नम्रता लोंढे, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, संभाजी राळे, शिवाजीराव पवार, ज्येष्ठ नागरिक नवनाथ गाढवे, दत्ता गवस, सत्यम देशमुख, अजय जगताप, संतोष राठोड इत्यादी मान्यवर आणि परिसरातील अनेक महिला भगिनी व संघर्ष संस्था प्रतिष्ठानचे सर्व सदस्य होते.