चिंचवड, (लोकमराठी) : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व सह्यकडा ऍडव्हेंचर प्रतिष्ठान यांच्या वतीने 12 जानेवारीला सकाळी 6 वाजता मिनी मॅरॉथॉनचे आयोजन केले आहे.
‘एक पाऊल आरोग्यासाठी’ या ब्रीद वाक्य घेऊन 2018 सुरु केलेल्या साह्यथॉन या मिनी मॅरॉथॉनचे हे तिसरे वर्ष आहे. जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडावे, हे उद्दिष्ट असते.
यामध्ये 3, 5 व 10 किलोमीटर असे अंतर ठेवले आहे. सहभागासाठी कमीत कमी फी ठेवली असून चिंचवड-शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे मॅरेथॉनचे रेजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. तरी लवकरात लवकर आपले रेजिस्ट्रेशन करावे,असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले आहे.