पिंपरी : कोरोनाला रोखण्याचा महत्वचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केद्रांची संख्या दुप्पट करण्याची मागणी आम आदमी पार्टी चे युवाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांच्या तर्फ़े महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास ३० लाखाच्या आस पास आहे. सध्यस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ६० लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत आणि ७ जुलै २०२१ पर्यंत ७,३५,७६३ नागरिकांचे लसीकरण झाले आहेत. आकडेवारी बघता अजून जवळपास २२ लाख नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे.
सध्या कार्यान्वित असलेल्या लसीकरण केंद्रा मध्ये नागरिकांच्या सकाळी ६ वाजल्या पासून मोठं मोठ्या रांगा दिसून येत आहे परंतु राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे रांगेत उभं राहून सुद्धा काही नागरिकांचे लसीकरण होत नाहीये. पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर असल्यामुळे बहुसंख्य नागरिक कामगार आहेत आणि त्यामुळे या प्रक्रियेचा नागरिकांना त्रास होत आहे.
सध्या कार्यान्वित ६० लसीकरण केंद्रे बाकी २२ लाख नागरिकांचे लसीकरण कसे करू शकतील हा चिंतेचा विषय आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता आपण शहरा मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र वाढवून दुप्पट करावी असे मत आपचे युवा ज़िल्हा अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी व्यक्त केले.