अनंतनगर तरुण मित्र मंडळाची पर्यावरणपूरक फुलांची आकर्षक सजावट

अनंतनगर तरुण मित्र मंडळाची पर्यावरणपूरक फुलांची आकर्षक सजावट

पिंपळे गुरव : येथील अनंतनगर तरुण मित्र मंडळ दरवर्षी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून प्रसिध्द आहे. यंदा हे मंडळ ४९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडप डेकोरेटरचे आशिष जगताप यांनी आकर्षक सजावट केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता, महाराष्ट्र शासनाच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार पर्यावरणपूरक फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच येथे दहा दिवस लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्याचा मंडळाचा मानस आहे.

मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित शिंदे, यशवंत दाभाडे, निलेश कुंभार, विशाल चव्हाण, कल्पेश गांधी, केतन चव्हाण, संकेत गुजर, सुरज कुंभार, प्रविण शिंदे, प्रतिक मोरे, अशोक मदने, उमेश गांधी बाबू शिंदे, मनिष चव्हाण, सुहास कुंभार, शुभम पवार, राजेश गायकवाड, प्रविण चक्रनारायण, सोन्या लोखंडे आदी सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे.

दरम्यान, पुढील वर्षी मंडळ ५० वर्षात पदार्पण करीत असून मंडळाचे वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. करोनाच्या काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्य गरजूंना मदत केली. असे कार्याध्यक्ष रोहित शिंदे यांनी सांगितले.