Tag: Pimple Gurav

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना 
सिटिझन जर्नालिस्ट

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना

पिंपळे गुरव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाचे आगमन शिवमुद्रा रथामधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात झाले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून लहान मुले, महिला, पुरुष यावेळी सहभागी झाले होते. मंडळाचे हे ५१ वर्षे असून औंध येथील चंद्रकांत कदम ढोल-ताशा लेझीम पथकाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकी वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंडळाने या वर्षी ' जागर देवीचा ' हा आकर्षक देखावा सादर केला आहे. तसेच यावर्षी मंडळाने अनाथ आश्रमाला मदत करण्यासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला असून अनाथ आश्रमातील मुलांना आरतीचा मान दिला जाणार आहे. त्याचबरोबर अन्नदान केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाणार असून रक्तदात्यास छोटेसे गिफ्ट देणार येणार आहे. असी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मोरे, उपाध्यक्ष्य गणेश कुंभार, कार...
अनंतनगर तरुण मित्र मंडळाने साकारली रायगडाची प्रतिकृती
पिंपरी चिंचवड

अनंतनगर तरुण मित्र मंडळाने साकारली रायगडाची प्रतिकृती

पिंपरी गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वसुबारसनिमित्त पुजा करण्यात आली व साई मंदिर परिसरात दीपोत्सवास करण्यात आला. त्यामुळे परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच मंडळाच्या वतीने रायगड किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. किल्ल्याची माहिती देण्यासाठी प्रोजेक्टर लावण्यात आला असून परिसरातील नागरिक, गडप्रेमी व शिवभक्त या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी येते आहेत. https://youtu.be/MwIpSDs7GwM ही प्रतिकृती बनविण्याची संकल्पना मंडळाचे कार्यकर्ते विशाल चव्हाण व जशवंत दाभाडे यांची आहे. तर निलेश कुंभार, उमेश गांधी, रोहित शिंदे, कल्पेश गांधी, संकेत गुजर, प्रतिक मोरे, सुरज कुंभार, प्रविण शिंदे, गणेश भंडालकर, गणेश कुंभार, अशोक मदने, मनिष चव्हाण, केतन चव्हाण, अजिंक्य शिंदे य...
अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर
पिंपरी चिंचवड, क्रीडा

अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ, अनंतनगर महिला मंडळ व वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कराटेचे साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ग्रँड मास्टर शिहान विक्रम मराठे व राजेंद्र कांबळे यांची टीम प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये किक्स, पंचेस, काथाज, स्पायरिंग, मंगलोरी कौले हात व पायांच्या सहाय्याने तोडणे, डोक्यावर फरशी फोडणे तसेच सहा इंची खिळे मारलेल्या फळीवर झोपून पोटावर फरशा ठेवून १८ एलबीएस वजनाच्या घनाने तोडण्यात आली. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व नागरिकांना कराटेचे महत्व सांगण्यात आले. https://youtu.be/WTyEi0mov6A आज आपण दूरचित्रवाणीवरून, वर्तमानपत्रांमधून पाहतोय अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतात. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे नागपूर, अमरावती, डोंबिवली, पालघर, साकीनाका, पुणे आणि इतर ठिकाणी महिलावर अत्य...
अनंतनगरमध्ये गरबा, भोंडला व नृत्य स्पर्धा उत्साहात
पिंपरी चिंचवड

अनंतनगरमध्ये गरबा, भोंडला व नृत्य स्पर्धा उत्साहात

पिंपळे गुरव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने गरबा, भोंडला, संगित खुर्ची, ऑर्केस्ट्रा व नृत्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या कार्यक्रमांचा आनंद घेतला. अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यामध्ये महिला व मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. यावर्षीही हा उत्सव आनंदात साजरा झाला. दरम्यान, शंकर जगताप, वैशाली जवळकर, पिंटू जवळकर, शाम जगताप, सागर आंघोळकर, दिपक काशिद, रूपाली लांडगे आदी मान्यवरांच्या हस्ते नऊ दिवसांमध्ये देवीची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन अनंतनगर तरुण मित्र मंडळातर्फे करण्यात आले. https://youtu.be/y0Yx1Uy98_k ...
अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन
पिंपरी चिंचवड

अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन

पिंपळे गुरव : पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची परंपरा आहे. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने आवारातच अगदी साध्या पध्दतीने फुलांची आकर्षक सजावट केलेल्या पाण्याच्या हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या भक्तूमय वातावरणात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.." अशा जयघोषात विसर्जन कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, पुढील वर्षी मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून त्यानिमित्त पुढील वर्षाच्या बॅनरचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महिला व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार आहेत. ...
घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस
सिटिझन जर्नालिस्ट

घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथे राहणाऱ्या संजय जाधव या तरूणाने कागदी कपापासून गणपतीची आरस केली आहे. पर्यावरणपूरक केलेली ही सजावट नागरिकांचे आकर्षण ठरली आहे. रंगीत विद्युत दिव्यांची भोवताली रोषणाई केली असून समोर प्लास्टिकची फुले व गणपतीच्या मागे पुठ्ठ्यावर पांढऱ्या रंगाचा मऊ कपडा लावला आहे. त्यामुळे आजूनच शोभा वाढली आहे. https://youtu.be/dZiZ6K1Sllg सुमारे ४०० कागदी कपांचा वापर यासाठी केला असून दरवर्षी नवनवीन प्रयोग करत संजय देखावा साकारत असतो. ही सजावट करण्यासाठी पत्नी रोहिनी, मुलगा अरविंद व मुलगी आरोहि या चिमुरड्यांनीही मदत केली. असे संजयने आवर्जून सांगितले. मागील सहा वर्षांपासून संजय गणपती प्रतिष्ठापना करतो. संजयचा (मो. नं. ९८८१७८३४५८, ७०४०२६९६९०) श्रीशांत पुणेरी ढोल पथकाचा व्यवसाय आहे. ...
पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा
पिंपरी चिंचवड

पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथील भगतसिंग चौकात श्री गणेश तरूण मित्र मंडळाने यावर्षी सध्याच्या वास्तव परिस्थितीवर आधारित लॉकडाऊन देखावा साकारला आहे. हा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत असून विचार करायला भाग पाडत आहे. https://youtu.be/LVt8XNcyIvQ मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते वाजंत्री असून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद झाले. याच परिस्थितीला अनुसरून मंडळाने देखावा तयार केला आहे. शाम गायकवाड व अंकुश जाधव यांनी २२ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना केली. कागद, पुठ्ठा, थर्माकोलचा वापर केलेल्या या देखाव्यात भारतातील लॉकडाऊन, पिंपरीतील वायसीएम रूग्णालय, औषधाचे दुकान यासह बंद दुकाने, मंदिर, दर्गा, सुमसाम रस्ते दाखवण्यात आले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मंडळाच्या वतीने पाळत गणेशोत्सव साजरा केला आहे. तसेच लोकांमधे कोरोन...
शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती
पिंपरी चिंचवड

शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ गणपतीची शुक्रवारची आरती शिवसेना दिघी शाखा प्रमुख संतोष वाळके व उद्योजक निलेश जवळकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी संतोष वाळके यांचा सत्कार कल्पेश गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर निलेश जवळकर यांचा सत्कार सुरज कुंभार व अशोक मदने यांच्या हस्ते झाला. तर दिघी युवासेनेचे तेजस घुले यांचा सत्कार उमेश गांधी यांच्या हस्ते आणि जाहिर शेख यांचा सत्कार मनेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन केतन चव्हाण यांनी केले. ...
अनंतनगर तरुण मित्र मंडळाची पर्यावरणपूरक फुलांची आकर्षक सजावट
पिंपरी चिंचवड

अनंतनगर तरुण मित्र मंडळाची पर्यावरणपूरक फुलांची आकर्षक सजावट

पिंपळे गुरव : येथील अनंतनगर तरुण मित्र मंडळ दरवर्षी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून प्रसिध्द आहे. यंदा हे मंडळ ४९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडप डेकोरेटरचे आशिष जगताप यांनी आकर्षक सजावट केली. https://youtu.be/mG1yArgULxU कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता, महाराष्ट्र शासनाच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार पर्यावरणपूरक फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच येथे दहा दिवस लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्याचा मंडळाचा मानस आहे. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित शिंदे, यशवंत दाभाडे, निलेश कुंभार, विशाल चव्हाण, कल्पेश गांधी, केतन चव्हाण, संकेत गुजर, सुरज कुंभार, प्रविण शिंदे, प्रतिक मोरे, अशोक मदने, उमेश गांधी बाबू शिंदे, मनिष चव्हाण, सुहास कुंभार, शुभम पवार, र...