पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा

पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथील भगतसिंग चौकात श्री गणेश तरूण मित्र मंडळाने यावर्षी सध्याच्या वास्तव परिस्थितीवर आधारित लॉकडाऊन देखावा साकारला आहे. हा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत असून विचार करायला भाग पाडत आहे.

मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते वाजंत्री असून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद झाले. याच परिस्थितीला अनुसरून मंडळाने देखावा तयार केला आहे. शाम गायकवाड व अंकुश जाधव यांनी २२ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना केली.

कागद, पुठ्ठा, थर्माकोलचा वापर केलेल्या या देखाव्यात भारतातील लॉकडाऊन, पिंपरीतील वायसीएम रूग्णालय, औषधाचे दुकान यासह बंद दुकाने, मंदिर, दर्गा, सुमसाम रस्ते दाखवण्यात आले आहेत.

कोरोनाबाबत जनजागृती

शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मंडळाच्या वतीने पाळत गणेशोत्सव साजरा केला आहे. तसेच लोकांमधे कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. दरम्यान, कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता मंडळ स्वखर्चाने गणेशोत्सव साजरा करत असते.

देखावा तयार करण्यासाठी शाम गायकवाड, अंकुश जाधव, अविनाश जाधव, अर्जुन पवार, सागर जाधव, संजय जाधव, रवींद्र पवार, अभिषेक गायकवाड, विशाल पवार, आकाश पवार, उमेश जाधव, रितेश पवार, शुभम जाधव, कुणाल जाधव, आदित्य पवार, रोहित पवार, अक्षय जाधव, संदीप जाधव, राहुल पवार, महेश जाधव, राजेश जाधव आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.