घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस

घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथे राहणाऱ्या संजय जाधव या तरूणाने कागदी कपापासून गणपतीची आरस केली आहे. पर्यावरणपूरक केलेली ही सजावट नागरिकांचे आकर्षण ठरली आहे.

रंगीत विद्युत दिव्यांची भोवताली रोषणाई केली असून समोर प्लास्टिकची फुले व गणपतीच्या मागे पुठ्ठ्यावर पांढऱ्या रंगाचा मऊ कपडा लावला आहे. त्यामुळे आजूनच शोभा वाढली आहे.

सुमारे ४०० कागदी कपांचा वापर यासाठी केला असून दरवर्षी नवनवीन प्रयोग करत संजय देखावा साकारत असतो. ही सजावट करण्यासाठी पत्नी रोहिनी, मुलगा अरविंद व मुलगी आरोहि या चिमुरड्यांनीही मदत केली. असे संजयने आवर्जून सांगितले. मागील सहा वर्षांपासून संजय गणपती प्रतिष्ठापना करतो. संजयचा (मो. नं. ९८८१७८३४५८, ७०४०२६९६९०) श्रीशांत पुणेरी ढोल पथकाचा व्यवसाय आहे.