अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन

अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन

पिंपळे गुरव : पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची परंपरा आहे. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने आवारातच अगदी साध्या पध्दतीने फुलांची आकर्षक सजावट केलेल्या पाण्याच्या हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

मोठ्या भक्तूमय वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..” अशा जयघोषात विसर्जन कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, पुढील वर्षी मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून त्यानिमित्त पुढील वर्षाच्या बॅनरचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महिला व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार आहेत.

अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन
अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन
अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन