Tag: Ganesh Festival

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना 
सिटिझन जर्नालिस्ट

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना

पिंपळे गुरव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाचे आगमन शिवमुद्रा रथामधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात झाले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून लहान मुले, महिला, पुरुष यावेळी सहभागी झाले होते. मंडळाचे हे ५१ वर्षे असून औंध येथील चंद्रकांत कदम ढोल-ताशा लेझीम पथकाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकी वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंडळाने या वर्षी ' जागर देवीचा ' हा आकर्षक देखावा सादर केला आहे. तसेच यावर्षी मंडळाने अनाथ आश्रमाला मदत करण्यासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला असून अनाथ आश्रमातील मुलांना आरतीचा मान दिला जाणार आहे. त्याचबरोबर अन्नदान केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाणार असून रक्तदात्यास छोटेसे गिफ्ट देणार येणार आहे. असी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मोरे, उपाध्यक्ष्य गणेश कुंभार, कार...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन
पुणे, सामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन

हडपसर : (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अनंत चतुर्दशीनिमित्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरातील गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य केले. यावेळी निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृतीचे कार्य केले. ...
अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन
पिंपरी चिंचवड

अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन

पिंपळे गुरव : पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची परंपरा आहे. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने आवारातच अगदी साध्या पध्दतीने फुलांची आकर्षक सजावट केलेल्या पाण्याच्या हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या भक्तूमय वातावरणात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.." अशा जयघोषात विसर्जन कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, पुढील वर्षी मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून त्यानिमित्त पुढील वर्षाच्या बॅनरचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महिला व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार आहेत. ...
पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा
पिंपरी चिंचवड

पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथील भगतसिंग चौकात श्री गणेश तरूण मित्र मंडळाने यावर्षी सध्याच्या वास्तव परिस्थितीवर आधारित लॉकडाऊन देखावा साकारला आहे. हा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत असून विचार करायला भाग पाडत आहे. https://youtu.be/LVt8XNcyIvQ मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते वाजंत्री असून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद झाले. याच परिस्थितीला अनुसरून मंडळाने देखावा तयार केला आहे. शाम गायकवाड व अंकुश जाधव यांनी २२ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना केली. कागद, पुठ्ठा, थर्माकोलचा वापर केलेल्या या देखाव्यात भारतातील लॉकडाऊन, पिंपरीतील वायसीएम रूग्णालय, औषधाचे दुकान यासह बंद दुकाने, मंदिर, दर्गा, सुमसाम रस्ते दाखवण्यात आले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मंडळाच्या वतीने पाळत गणेशोत्सव साजरा केला आहे. तसेच लोकांमधे कोरोन...
शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती
पिंपरी चिंचवड

शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ गणपतीची शुक्रवारची आरती शिवसेना दिघी शाखा प्रमुख संतोष वाळके व उद्योजक निलेश जवळकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी संतोष वाळके यांचा सत्कार कल्पेश गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर निलेश जवळकर यांचा सत्कार सुरज कुंभार व अशोक मदने यांच्या हस्ते झाला. तर दिघी युवासेनेचे तेजस घुले यांचा सत्कार उमेश गांधी यांच्या हस्ते आणि जाहिर शेख यांचा सत्कार मनेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन केतन चव्हाण यांनी केले. ...
महिला सबलीकरणासाठी उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – महापौर माई ढोरे
पिंपरी चिंचवड

महिला सबलीकरणासाठी उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – महापौर माई ढोरे

पिंपळे सौदागर : महिला कुठेही कमी पडू नये, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून स्वता:सह आपल्या परिवाराची व समाजची प्रगती करावी. हा महिला सबलीकरणाचा उद्देश असलेले उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा आशयाचे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी येथे केले. उन्नती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'ती'चा गणपती या विशेष गणेशोत्सवानिमित्त महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते गणपती आरती करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. https://youtu.be/mSWNa7Dnthw त्याप्रसंगी उपमहापौर हिराबाई नानी घुले, नगरसेविका आरती चौधे, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वला गावडे, आपला आवाज आपली सखी संचालिका संगिता तरडे, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, नेहा गमे, गौरी कुटे, कविता भिसे, अश्विनी भिसे, मोहिनी मेटे आदी मान्यवरांना गणपती आरतीचा...
घरगुती गणपती : भोसले परिवाराने साकारला शनिवारवाडा व विसर्जन मिरवणूकीची प्रतिकृती
पुणे

घरगुती गणपती : भोसले परिवाराने साकारला शनिवारवाडा व विसर्जन मिरवणूकीची प्रतिकृती

https://youtu.be/TKOCmYDcZlY चव्होली बुद्रुक : येथील रहिवासी भोसले परिवाराने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा व त्यासमोर पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली विसर्जन मिरवणूकीची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून तयार केलेला हा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरला आहे. भोसले परिवार यांच्या घरी अनेक वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी भोसले परिवार गणपतीची आरस करताना नवनवीन प्रयोग करत असतो. या वर्षी त्यांनी पुठ्ठ्याच्या सहाय्याने शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार केली असून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. या प्रवेशद्वारासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखाव्यात आणखीनच भर टाकत आहे. प्रियंका अमोल भोसले यांचा हा देखावा आकर्षण ठरत असून देखावा साकारण्यासाठी त्यांचे पती अमोल, सासरे सूर्यकांत वामन भोसले व...
घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती
पिंपरी चिंचवड

घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती

काळेवाडी : ज्योतिबानगरमधील श्रद्धा कॉलनीमध्ये राहणाऱ्या अमोल कांबळे या तरूणाने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारली आहे. तर वाड्याला साजेशी पेशवे पगडी परिधान केलेली गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अमोल याच्या घरी मागील २८ वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी अमोल गणपतीची आरस करताना नवीन प्रयोग करत असतो. या वर्षी त्याने पुठ्ठ्याच्या सहाय्याने शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार केली असून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. या प्रवेशद्वारवर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्रे लावली आहे. अमोल याचा हा देखावा आकर्षण ठरत असून यासाठी त्याला त्याची आई शोभा, वडील बाळासाहेब व भगिनी प्रियंका शिंदे यांची मोलाची मदत मिळाली. असे अमोल याने लोकमराठ...
मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश
पिंपरी चिंचवड, सामाजिक

मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

पिंपरी : मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हिताय सोशल फाउंडेशन संस्थेच्या सामाजिक बंधुत्वाचा प्रत्यय खराळवाडी - गांधीनगर येथे आला. मानवता हिताय या संस्थेच्या या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे. https://youtu.be/_-oMy2SAAeA त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, तसलीम शेख, कासीमभाई शेख, अब्दुलभाई शेख, इमरान शेख (गुड्डू), सैफी आलम, मोहम्मद आमीर, नामदेव (आबा) जाधव आदी उपस्थित होते. गणेशोत्सवनिमित्त मानवता हितायने हा एक सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला असून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, मानवता हिताय संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त सलग दहा दिवस गरजू, गरीब व दिव्यांगांना धान्यकिट वाटप करण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. असे मानवता हिताय स...
‘बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना
पुणे

‘बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना

पुणे (लोकमराठी) : गणेशोत्सव 'इको फ्रेंडली' साजरा करण्याकडे मागील काही वर्षांपासून पुणेकरांचा कौल वाढत आहे. अनेक नागरिक आपल्या घरातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करत आहेत. त्यात नितीन कुलकर्णी हे एक असून त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये सुंदर आणि पर्यावरणपूरक "बांबूच्या झोपडी'मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. कोथरूड येथील व्यावसायिक असलेले कुलकर्णी यांनी या वर्षी बांबूच्या पट्ट्यांपासून निर्माण केलेल्या चटईचा वापर करत "झोपडी' हा दहा फुटी देखावा साकारला आहे. देखाव्यासाठी वापरलेल्या सर्व गोष्टी या पर्यावरणपूरक असून झोपडीच्या छतासाठी गवताचा वापर केला आहे. तसेच देखावा सजावटीसाठी घरातील झाडांचा वापर करण्यात आला आहे. कोणतीही विद्युतरोषणाई न करता वातीच्या पंत्यांचा वापर सजावटीसाठी त्यांनी केला आहे. कुलकर्णी हे मागील चार वर्षांपासून वेगवेगळ्या विषयावर पर्यावरणपूरक गणपतीची सजावट करतात....