घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती

घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती

काळेवाडी : ज्योतिबानगरमधील श्रद्धा कॉलनीमध्ये राहणाऱ्या अमोल कांबळे या तरूणाने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारली आहे. तर वाड्याला साजेशी पेशवे पगडी परिधान केलेली गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

अमोल याच्या घरी मागील २८ वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी अमोल गणपतीची आरस करताना नवीन प्रयोग करत असतो. या वर्षी त्याने पुठ्ठ्याच्या सहाय्याने शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार केली असून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. या प्रवेशद्वारवर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्रे लावली आहे.

अमोल याचा हा देखावा आकर्षण ठरत असून यासाठी त्याला त्याची आई शोभा, वडील बाळासाहेब व भगिनी प्रियंका शिंदे यांची मोलाची मदत मिळाली. असे अमोल याने लोकमराठी न्यूजला सांगितले.