शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती

शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ गणपतीची शुक्रवारची आरती शिवसेना दिघी शाखा प्रमुख संतोष वाळके व उद्योजक निलेश जवळकर यांच्या हस्ते करण्यात आली.

त्यावेळी संतोष वाळके यांचा सत्कार कल्पेश गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर निलेश जवळकर यांचा सत्कार सुरज कुंभार व अशोक मदने यांच्या हस्ते झाला. तर दिघी युवासेनेचे तेजस घुले यांचा सत्कार उमेश गांधी यांच्या हस्ते आणि जाहिर शेख यांचा सत्कार मनेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन केतन चव्हाण यांनी केले.

शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती