झोपडपट्टी भागातील लहान मुलांची आरोग्य तपासणी करा – दिपक चखाले

झोपडपट्टी भागातील लहान मुलांची आरोग्य तपासणी करा - दिपक चखाले

वाकड : (Wakad) येथील काळाखडक झोपडपट्टी, म्हातोबानगर झोपडपट्टी व अण्णाभाऊ साठे नगर झोपडपट्टी भागातील दहा वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी होणे गरजेची आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येक झोपडपट्टीत एक दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केली आहे.

याबाबत चखाले यांनी (PCMC) महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले असून त्याची प्रत जेष्ठ वैद्यकीय अधीकारी डाॅ. अभय दादेवार व डाॅ. शितल शिंदे यांची सादर केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या (Corona) तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेत तसेच एक ते दीड वर्षापासुन लहान मुले घरी आहेत. त्यात आँनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून काही शारीरीक व मानसिक परिणाम झालेले आहेत का? पावसाळी साथीचे रोग सर्दी, खोकला, ताप किंवा (ENT) कान, नाक, घसा व अन्य आजार व त्यावरील प्राथमिक ऊपचार त्याचबरोबर शाळा चालू होण्यापुर्वी मुलांचे आरोग्य ठणठणीत असणे आवश्यक आहे. यासाठी (Pimpri Chinchwad) महानगरपालिका आरोग्य विभागाकडून झोपडपट्टीत राहणारे मुलां-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करावी.