अनंतनगर तरुण मित्र मंडळाने साकारली रायगडाची प्रतिकृती

अनंतनगर तरुण मित्र मंडळाने साकारली रायगडाची प्रतिकृती

पिंपरी गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वसुबारसनिमित्त पुजा करण्यात आली व साई मंदिर परिसरात दीपोत्सवास करण्यात आला. त्यामुळे परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच मंडळाच्या वतीने रायगड किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

किल्ल्याची माहिती देण्यासाठी प्रोजेक्टर लावण्यात आला असून परिसरातील नागरिक, गडप्रेमी व शिवभक्त या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी येते आहेत.

ही प्रतिकृती बनविण्याची संकल्पना मंडळाचे कार्यकर्ते विशाल चव्हाण व जशवंत दाभाडे यांची आहे. तर निलेश कुंभार, उमेश गांधी, रोहित शिंदे, कल्पेश गांधी, संकेत गुजर, प्रतिक मोरे, सुरज कुंभार, प्रविण शिंदे, गणेश भंडालकर, गणेश कुंभार, अशोक मदने, मनिष चव्हाण, केतन चव्हाण, अजिंक्य शिंदे यांनी परिश्रम घेतले.