पिंपळे गुरव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने गरबा, भोंडला, संगित खुर्ची, ऑर्केस्ट्रा व नृत्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या कार्यक्रमांचा आनंद घेतला.
अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यामध्ये महिला व मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. यावर्षीही हा उत्सव आनंदात साजरा झाला.
दरम्यान, शंकर जगताप, वैशाली जवळकर, पिंटू जवळकर, शाम जगताप, सागर आंघोळकर, दिपक काशिद, रूपाली लांडगे आदी मान्यवरांच्या हस्ते नऊ दिवसांमध्ये देवीची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन अनंतनगर तरुण मित्र मंडळातर्फे करण्यात आले.