नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यातर्फे गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यातर्फे गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आकुर्डी : नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण तसेच दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त शिक्षण तज्ज्ञ विवेक वेलणकर यांचे करिअर मार्गदर्शन ठेवण्यात आले.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका व शिवसेना शहर संघटीका उर्मीला काळभोर, युवा नेते झिशान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते यशवंत तरळ, आबा गायकवाड, गौतम जगताप व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात ३२२ महिला स्पर्धक तसेच २७८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केले होते.