राजेंद्र पवार यांना श्री मोरया पुरस्कार प्रदान

राजेंद्र पवार यांना श्री मोरया पुरस्कार प्रदान
चिंचवड : राजेंद्र पवार यांचा सन्मान करताना सुनेत्रा पवार, अश्विनी चिंचवडे, डॉ. एकनाथ खेडेकर, मंदार महाराज देव आदी

चिंचवड : महासाधु श्री. मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे सामाजिक योगदानाबद्दल बांधकाम व्यवसायिक राजेंद्र सोपान पवार यांना यंदाच्या श्री मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, डॉ. एकनाथ खेडेकर नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, हभप.आनंद तांबे, अपर्णा डोके, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, ऑस्टिन ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक राजू भिसे, गजानन चिंचवडे, विजय पवार, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पारखे, पांडुरंग नवले, सुनिल जोशी, दिपक नवले, संतोष साठे, हभप. उत्तमराव बोडके, ओमकार पवार, संदीप दळवी, निलेश दळवी, गजानन वाल्हेकर, योगेश वाल्हेकर, राहुल भेगडे, महाविर गांधी, संजय पवार, राम सुकरे उपस्थित होते.

समाजाचे आपण देणं लागतो या उदात्त भावनेतून राजेंद्र पवार अनेक वर्षे समाजसेवेत आहेत. अनाथालय व वृद्धाश्रमांना ते नियमित अन्य-धान्य पुरवितात. लॉकडाऊनमध्ये गरजू नागरिक, वीटभट्टी व लेबरकॅम्प मधील हजारो बांधकाम कामगारांच्या पोटाचा प्रश्न त्यांनी सोडविला. जनावरे, पशु-पक्षांच्या चारा-पाण्याची सोय केली. भिक्षेकऱयांसाठी काम करणाऱ्या बेगर्स डॉकटर्स या संस्थेला देणगी दिली. त्यांना कोरोना योद्धा या किताबाबरोबर बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार गृह प्रकल्प उभरल्याची दखल घेत विविध संस्थांनी गौरविले आहे.