लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा – दिपक चखाले 

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा - दिपक चखाले 
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे

आष्टी : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe) यांनी निर्माण केलेले जागतिक पातळीवरील साहित्य पाहता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना केंद्र सरकारने भारतरत्न द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने भारतरत्नसाठी शिफारस प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा, तसेच राज्यातील आमदार, खासदार, विविध संघटना, साहित्यिक यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा - दिपक चखाले 
दिपक चखाले

शिफारशी केल्या आहेत. या शिफारस मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट घेत आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने अण्णाभाऊंना तेच खरे अभिवादन ठरेल, असे दिपक चखाले यांनी म्हटले आहे.