क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटरी पॅड्स, मास्क, फेस शिल्ड व पिपिई किटचे वाटप | मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम 

क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटरी पॅड्स, मास्क, फेस शिल्ड व पिपिई किटचे वाटप | मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम 

पिंपरी चिंचवड : आकुर्डी येथील डि. वाय. पाटील कोविड क्वारंटाईन सेंटर येथे महिला वर्गाला होणाऱ्या मासिक पाळीची गंभीर परिस्थिती निदर्शनास आल्यावर मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स तसेच सदर ठिकाणी कार्यरत असणारे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना फेस मास्क, फेस शिल्ड व पिपिई किटचे वाटप करण्यात आले. या पुढेही शहराच्या विविध क्वारंटाईन सेंटरमधे सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्याचा संकल्प मानवता हिताय सोशल फाउंडेशनने केला आहे.

त्यावेळी मानवता हितायचे संस्थापक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, सचिव तानाजी साठी, खजिनदार व सल्लागार तृप्ती धनवटे रामाने, कार्याध्यक्ष ब्रम्हानंद कोरपे, भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे, उर्वशी इंगळे, अश्विनी पवळ, विशाल पवळ तसेच डॉ. तायडे, डॉ. जोशी मॅडम व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.