भाजप शहराध्यक्ष, महाराष्ट्र केसरी व महापालिका कामगार महासंघातील निवडीबद्दल रहाटणीतील सुपुत्रांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार

भाजप शहराध्यक्ष, महाराष्ट्र केसरी व महापालिका कामगार महासंघातील निवडीबद्दल रहाटणीतील सुपुत्रांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार
  • महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर याला रहाटणी ग्रामस्थांतर्फे ६१ हजारांचा गौरवनिधी

पिंपरी चिंचवड (लोकमराठी) : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा रहाटणी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच पैलवान हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र केसरी 2020 किताब मिळविल्याबद्दल आणि पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या निवडणूकीत रहाटणीगावचे सुपुत्र वस्ताद विलास तुळशीराम नखाते यांची कार्यकारणी सभासद व धनाजी रघुनाथ नखाते यांनी संघटकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. रहाटणी गावठाणात रविवारी हा कार्यक्रम झाला.

त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, मनोहर पवार, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, माजी स्विकृत सदस्य नवनाथ नढे, माजी उपमहापौर मरलीधर ढगे आदी उपस्थित होते.

माजी नगरसेवक मनोहर पवार म्हणाले, “अगोदर रहाटणी तालमीत पाय ठेवायला जगा मिळत नव्हती. मात्र, आता 27 लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात 27 पैलवान तयार होत नसतील. तर ही खुप खेदाची बाब आहे.”

उत्सव कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा नखाते, पै. कृष्णा तांबे, निलेश नखाते, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, युवा नेते मिलींद नखाते, आषितोष नखाते, हरेश नखाते, स्विकृत सदस्य संदीप नखाते, शिवसेना उपशहराध्यक्ष उल्हास कोकणे, नेताजी नखाते, नरेश खुळे, अजय कदम, हिरामण कापसे, पंढरी नखाते, अमोल नखाते, काळूराम नढे, दिलीप काळे, बापू जाधव, माजी स्विकृत सदस्य सखाराम नखाते, शामराव काळे, विशाल नखाते, राम मंदिर विश्वस्त अंकुश राजवाडे, श्रीराम नखाते, एकनाथ मंजाळ, प्रगतशील शेतकरी महादु कोकणे, मारूतीभाऊ नखाते, नितीन थिटे, दत्तात्रेय नखाते, अनिल नखाते, विजय नखाते, प्रल्हाद नखाते, भिमसेन नखाते, संतोष नखाते, शिवराज तांबे, हनुमंत नखाते, रमेश नखाते, मोरेश्वर नखाते, अरूण तांबे, काळुराम थोपटे, आदेश राजवडे, देविदास तांबे, किरण देवराम नखाते, नंदकुमार नखाते, विनोद नखाते, अविनाश नखाते, माऊली नढे, राकेश नखाते, उमेश तांबे, सोमनाथ नखाते, भगवान नखाते, अमृत नखाते, राहुल नखाते, विशाल भालेराव, आदीनाथ नखाते आदींनी संयोजन केले. सुत्रसंचालन सुनिल कुंजीर यांनी केले.