भोसरीत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; वाहिनी दुरूस्तीची नागरिकांची मागणी

भोसरीत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; वाहिनी दुरूस्तीची नागरिकांची मागणी
भोसरी: बालाजीनगरमध्ये रस्त्यावर वाहणारे घाण पाणी

भोसरी (लोकमराठी) : भोसरी येथील बालाजी नगरमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने वाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वहरा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सायराबानू सलीम शेख यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. तर गटारेही तुंबली आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेने लवकरात लवकर याची दखल घेणे गरजेचे आहे.