हातावर पोट भरणार्‍या गरिबांच्या पोटावर बुलडोजर ; राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त

हातावर पोट भरणार्‍या गरिबांच्या पोटावर बुलडोजर ; राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त

बाळासाहेब मुळे : लोक मराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : जाधववाडी-चिखली परिसरातील मंगळवारी (दि. १५) जाधव सरकार चौक ते आहेरवाडी चौक या रस्त्याच्या फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या सर्व पान टपरी, हातगाड्या यांच्यावरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानकपणे कारवाई केली. कोणतीही पुर्व नोटीस न देता बुलडोजर चालवला आणि क्रेनच्या साह्याने पानटपरी, हातगाडी उचलून जप्त करण्यात आले. आपल्या हातावरती पोट भरून जीवन जगणाऱ्या गोरगरिबांवर अचानकपणे अशाप्रकारे कार्यवाही करणाऱ्या पालिकेवर वरती सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे. अचानकपणे झालेल्या या कारवाईमुळे रोजीरोटीवर जीवन जगणाऱ्या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनंत सुपेकर हे लोकमराठी न्यूजशी बोलताना म्हणाले की, या अतिक्रमण कारवाई प्रकरणी आम्ही पालिका कर्मचाऱ्यांची संपर्क केला असता स्थानिक सत्ताधाऱ्यांचा आमच्या वरती दबाव आहे, आणि स्वच्छ सिटी या उपक्रमाचे नाव पुढे करून अशाप्रकारे निष्काळजीपणाचे समोरून उत्तर देण्यात आले. आधीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेतून नाराजीचा सूर आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे निराश होऊन सत्ताधारी आणि स्थानिक नेते दहशतीचा आणि दबावाचे राजकारण करून सामान्य जनतेस वेठीस धरत आहे. कुठल्याही प्रकारची पूर्व नोटीस न देता ही कारवाई केल्यामुळे गोरगरिबांच्या पोटावरती लाथ मारण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी स्वच्छ सिटीच्या नावाने केल आहे.

या कारवाईमुळे राष्ट्रवादी पार्टी संतप्त झालेली आहे. तातडीने सामाजिक कार्यकर्ते विशाल आहेर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये एक बैठक बोलावण्यात आली, यामध्ये माजी नगरसेवक वसंत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते विशाल आहेर, राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष अनंत सुपेकर, सामाजिक न्याय विभागाचे सुनील कुसाळकर, युवा नेते प्रशांत गाडे, विनोद इंगळे इत्यादींनी बैठकीमध्ये संताप व्यक्त करून या प्रकरणी आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविले आहे.