राष्ट्रवादी कामगार सेलच्या सहसचिवपदी दत्तात्रेय जगताप यांची निवड

राष्ट्रवादी कामगार सेलच्या सहसचिवपदी दत्तात्रेय जगताप यांची निवड

पिंपरी, बाळासाहेब मुळे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कामगार सेलच्या पिंपरी चिंचवड शहर सहसचिवपदी दत्तात्रेय जगताप यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (कामगार सेल) प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव खडकाळे यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी अनंत सुपेकर, पिंटू जगताप, बाळासाहेब मुळे, संदीप कुसालकर, गणेश ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते.

दत्तात्रय जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अशी अनेक पदे भुषविले आहेत. मागील सोळा वर्षे ते पक्षाचे एकनिष्ठपणे काम करत आहेत. असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, “देशाचे नेते शरद पवार साहेब, अजित पवार याचे विचार तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यात व पक्ष वाढीसाठी आवश्यक ती गोष्ट करण्यास मी कुठे ही कमी पडणार नाही.”

जगताप यांच्या निवडीमुळे अनेक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.