‘ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत’ शुभम वाईकरला गोल्ड मेडल

लोकमराठी न्यूज नेटवर्क 

औंध (प्रतिनिधी) : आय.बी.बी.एस.एस. असोसिएशनच्या वतीने ओडिसा येथील बालेश्वर येथे आयोजित केलेल्या ‘ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये’ औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शुभम वाईकर या विद्यार्थ्याने ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवित,  ‘ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत’ गोल्ड मेडल पदक मिळविले. ही स्पर्धा ८ व ९ फेब्रुवारी रोजी पार पडली.

त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी त्यांचे अभिनंदन करून, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह क्रीडा विभागप्रमुख प्रा. बी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असून, सर्वांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.