रमाई आवास योजनेसह प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टीतील त्याच जागेवर राबविण्याची मागणी

रमाई आवास योजनेसह प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टीतील त्याच जागेवर राबविण्याची मागणी

पिंपरी : रमाई आवास योजने सोबत प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्याच जागेवर राबविण्यात यावी. तसेच घर दुरुस्ती, बांधकाम करण्यासाठी शासकीय अनुदान देण्यात यावे. अशी मागणी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे प्रा. बी. बी. शिंदे यांनी मंगळवारी (ता. १५) महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, पिंपरी चिंचवड कार्यकारिणी महिला कार्याध्यक्षा शलन ओव्हाळ उपस्थित होते.

यावेळी या विषयांकित प्रश्नावर आयुक्तांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी या दोन्हीही योजना जागेवरच राबविणार असल्याचे सांगितले. अशी माहिती प्रा. बी. बी. शिंदे यांनी दिली.