यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात साजरा

यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात साजरा

पिंपरी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मंगळवारी (दि. १५ फेब्रुवारी) मातृ – पितृ पूजन दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालय नेहमीच आपल्या भारतीय संस्कृतीची जपवणूक करणाऱ्या व विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असते. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्याला आई -वडील याचा आपण आदर केला पाहिजे. याची शिकवण दिली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात साजरा

कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते यांनी मातृ-पितृ पूजननाचे महत्व विध्यार्थ्यांना सांगितले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी विद्यार्थ्यांना मातृ-पितृ पूजन दिवस कसा साजरा करावा, त्याचे जीवनातील महत्व समजावून सांगितले. त्यावेळी श्री योग वेदांत सेवा समितीच्या तारिका साळूंखे, सारिका क्षीरसठ, अपर्णा पोफळे, प्रवीणा पांचाळ, ललिता हलदे, मीनाक्षी शेलार, सुनिता जगदाळे, सुचित्रा बोधे आदि मान्यवर उपस्थित होते.

मातृ-पितृ पूजनासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे आरतीचे ताट सजवले होते. पूजेसाठी हार तयार केले होते. पालकही छान तयार होऊन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. योग्य मंत्रोच्चारासह पूजन संपन्न झाले. काही विद्यार्थ्यांनी घरीच पालकाचे पूजन केले व छान व्हिडीओ बनविले. अशा प्रकारे मोठ्या आनंदी वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यकामाची सांगता पसायदानने करण्यात आली.

व्हिडीओ पहा : https://youtube.com/shorts/3VAIhzCrfj0?feature=share