माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर गुन्हेगारी मार्गही आधुनिक

माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर गुन्हेगारी मार्गही आधुनिक

ज्योत्स्ना राणे

भारत देशात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांचा आलेखहि वाढत आहे़. या आधुनिक जगात माहिती व तंत्रज्ञानाचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुन्हे करण्याचे मार्ग सुध्दा आधुनिक झाले आहेत. जागतिकीकरणानंतर देशात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर वाढल्यामुळे व दैनदिन कामे सोपे, जलदगतीने होण्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यामुळे फायदा झाला असला, तरी काही लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत.

संगणकाच्या एका कीबोर्डवर सर्व व्यवहार आले आहेत. त्याबरोबर गुन्हेगारांना सुध्दा नवीन क्षेत्र उपलब्ध झाले आहे. पारंपारिक पध्दतीचे गुन्हे करुन आपले इप्सित साध्य करणारे गुन्हेगार, आता संगणकाच्या माध्यमातुन सायबर स्पेसमध्ये इलेक्ट्रॉनिक व संगणकीय वातावरणात आता गुन्हे करायला लागले आहेत. संगणकीय क्षेत्रामध्ये केलेल्या अपराध्यांना किंवा गुन्हेगारांना सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम असे म्हणतात.