दिघी : येथील दिघीचा आदिवासी वाघ संस्थेच्या वतीने पिंपरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत रेंगडे यांनी अभिवादन करताना म्हणाले की,”महिलांच्या शिक्षणासाठी मोठे कार्य करणाऱ्या या माऊली पुढे हजार वेळा नतमस्तक झाले तरी कमीच पडेल. आज ज्या महिला शक्तीची चर्चा होत आहे. त्याची बीजे रोवून त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडून सुरुवात केली होती. प्रत्येक स्त्रीने आपल्यालातील सावित्रीला ओळखून शक्तीवान निर्भया बनले पाहिजे.”
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंत रेंगडे, बाळासाहेब तिटकारे, अमोल देवकर, सचिन दुबळे, दिपक लोंखडे आदी उपस्थित होते.
- महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव
- तीन लाख लाडक्या ‘बहिणी’ राहिल्या वंचित
- एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी
- विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण