डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संविधानाच्या 100 प्रस्ताविकाचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संविधानाच्या 100 प्रस्ताविकाचे वाटप

रहाटणी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त लिनियर अर्बन गार्डन पिंपळे सौदागर या ठिकाणी चैतन्य हास्य क्लब व ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागरच्या सर्व सदस्यांना प्रस्ताविकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रस्ताविकाचे पठण व वाचन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, चैतन्य हास्य क्लबचे अध्यक्ष भागवत झोपे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राम साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भातकुले, पुरुषोत्तम गाणार, बाळासाहेब शेंडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांप्रती योगदान या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या व चैतन्य हास्य क्लब यांच्या सर्व सभासदांना प्रास्ताविकाचे वाटप करून पठण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मारावार यांनी केले, तर शैलेजा गुजलवार यांनी आभार मानले.