मनसे युवानेते प्रविण माळी यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप

मनसे युवानेते प्रविण माळी यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे युवानेते प्रविण माळी आणि सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता माळी यांच्या माध्यमातून रावेत, शिंदेवस्ती प्रभागातील गरजू विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ओंकार शिंगटे, मोहमद शेख, युवराज बनसोडे आदी उपस्थित होते.