डॉ. गुंजकार व साईराज देशमुख यांचा कोव्हीड योध्दा म्हणून गौरव

डॉ. गुंजकार व साईराज देशमुख यांचा कोव्हीड योध्दा म्हणून गौरव

पिंपरी : स्वातंत्र्यदिनी गणेश इंटरनॅशनल स्कुलतर्फे डॉ. गुंजकार व साईराज ग्रुपचे संचालक साईराज देशमुख यांना आपत्कालीन परिस्थितीत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल शाल, श्रीफळ, ट्रॉफी व कोव्हीड योध्दा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

डॉ. गुंजकरांचे यांचे चिखली येथे हॉस्पिटल आहे. त्यामाध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केली. तर साईराज देशमुख यांनी रुग्णवाहिकेमार्फत २४ तास लोकांची सेवा केली. त्यांच्या या चांगल्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.