देशाला पुढे नेण्याची प्रत्येकाची जबाबदारी- अतिरिक्त पोलिस महासंचालक सिंघल

देशाला पुढे नेण्याची प्रत्येकाची जबाबदारी- अतिरिक्त पोलिस महासंचालक सिंघल

लोक मराठी : पुण्याचा,महाराष्ट्राचा पर्यायाने देशाच्या विकासासाठी आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजेत. देशाला पुढे नेण्यासाठी दूरदृष्टी ठेवली पाहिजेत. असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी केले.

श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड-प्राधिकरणच्या वतीने अग्रसेन महाराज जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी बांधकाम व्यावसायिक नरेश मित्तल,अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष भीमसेन आगरवाल, कार्याध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सचिव रमेश गोयल, माजी अध्यक्ष सुभाष बंसल, माजी नगरसेवक मामनचंद आगरवाल, महिला मंडळ अध्यक्ष मंजू बंसल, सुनील जयकुमार आगरवाल, मुकेश मित्तल,खजिनदार सत्पाल मित्तल, विनोद बंसल,उत्सव समिती प्रमुख वेदप्रकाश गुप्ता,विनोद मित्तल,अनिल ओमकारमल आगरवाल,अनिल आगरवाल,विजय आगरवाल,पवन गोयल, पंच कमिटी सदस्य डॉ. रमेश बंसल,डॉ. संतोष आगरवाल,रामअवतार आगरवाल,पन्नालाल गुप्ता,वेदप्रकाश माइचंद गुप्ता आदी उपस्थित होते.

यावेळी चारशे विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. नरेश मित्तल म्हणाले कि, अग्रसेन महाराज यांनी समाजाला एक आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भीमसेन आगरवाल यांनी केले सुत्रसंचालन नीना गुप्ता व मीनल जाजोदिया यांनी केले. तर आभार रमेश गोयल यांनी मानले.