प्रसिध्द छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात निधन

पुणे: मालिका,चित्रपट आणि माहितीपटांचे छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने बुधवारी (दि.२७) निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तसेच माहेरची साडी, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्हीच, दोघी, अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायादिग्दर्शन दुखंडे यांनी केले होते.

प्रसिध्द छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात निधन

हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिकेवरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्यावर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते. त्यात भूकंप, मजहब, गुलमोहर, अशा हिंदी , तर माहेरची साडी, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मधुचंद्राची रात, आत्मविश्वास, आमच्या सारखे आम्हीच, दोघी, निष्पाप, वाजवा रे वाजवा, दे टाळी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. दुखंडे यांना ‘निष्पाप ’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम छायादिग्दर्शनासाठी राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (उद्या) पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.