मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली.

मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

पिंपरी : गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली.
राज्यलोकलेखा समितीचे अध्यक्ष अड. सचिन पटवर्धन यांच्या शिष्टाईने पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या निवासस्थांनी समेट घडवियात आला. मनोमिलनाला बारणे यांनी जगताप यांना लोटांगण घातल्याची चर्चा आहे.मावळ लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात आमदार जगताप सहभागी झाले नव्हते. उलट जगताप यांच्यासह समर्थक नगरसेवकांच्या बैठकीत बारणे यांच्या उमेदवारीला विरोध करीत मतदारसंघावर भाजपाने दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सुरू असूनही अपयश मिळत होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पटवर्धन यांनी केलेली शिष्टाई कामी आली.केलेली

एकेकाळचे चांगले मित्र असलेल्या बारणे आणि जगताप यांच्यात २००९ पासून दुरावा निमाण झाला होता. मात्र, युती धर्माचे पालन करू असे जगताप यांनी पत्रकार परिषदेत काही दिवसांपूर्वी सागितले होते. मात्र, बारणे यांनी स्वतः माझ्याकडे येऊन माफी मागण्याची त्यांची अट होती. त्यानुसार पटवर्धन यांच्या पुढाकाराने बारणे यांनी जगताप यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली. एक तास चर्चा झाली, मात्र गुप्त बैठक असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार देण्यात आला.