विजय वडमारे सचिन बडे
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत उद्योग आधार व व्यवसाय परवाना (शॉप अॅक्ट लायसेन्स) काढून देण्याचा अभिनव उपक्रम श्री. धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांनी राबवला आहे. मागील सहा महिन्यांत या उपक्रमाचा 40 नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांनाकडून या तरूणांचे कौतुक केले जात आहे.
विजय नामदेव वडमारे व सचिन बडे असे या दोन तरूणांची नावे आहेत.
हे तरूण, व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज भरून घेत. तसेच ती कागदपत्रे संबंधित कार्यालयात व मिळालेले प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे काम हे तरूण मोफत करत आहेत. बाहेर या कामासाठी एजेंट सुमारे दिड हजार घेतात. मात्र, हे तरूण दिव्यांगासाठी हि सेवा मोफत देत असल्याने त्यांची मोठी आर्थिक बचत होते. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत विजय वडमारे म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींनी उद्योग, व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धनंजय मुंडे यांचा मार्गदर्शनाखाली मागील सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा घडते. त्यामुळे मोठे मानसिक समाधान मिळते.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे