देव-दर्शन युवा मंच तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा

देव-दर्शन युवा मंच तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा

लोकमराठी न्यूज नेटवर्क


चिंचवड : पिंपरी-मोहननगर मध्ये, देव-दर्शन युवा मंच पिंपरी चिंचवड शहर तर्फे दहावी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा विषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या.


त्यावेळी दिपक रामचंद्र जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीमध्ये तंदुरुस्त शरीर कसे ठेवायचे, वेळेचे नियोजन कसे करायचे याबाबत माहिती दिली.

त्याप्रसंगी दिनेश सेन, नागेश पवार, शरद लावंडसर, आशा सेन आणि वैशाली गायकवाड यांनी उपस्थिती होत्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.