दिघी : दिघीचा आदिवासी वाघ संस्थेच्या वतीने लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच नागरिकांना पेढे वाटून करून राजमाता जिजाऊ यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत रेंगडे यांनी अभिवादन करताना जिजाऊच्या कार्याची महती कथन केली. प्रत्येक जिजाऊच्या पोटी शिवराय जन्माला यावे, असे त्यांनी बोलताना आशा व्यक्त केली. त्याप्रसंगी ज्ञानेश आल्हाट, अमोल देवकर, कुंडलिक जगताप, रमेश साबळे, हरीभाऊ लबडे, सचिन दुबळे, विकास गाढवे, धनाजी खाडे, विकी अकूलवार, अभिमन्यू दोरकर, सुनील काकडे उपस्थित होते.