चिंचवडगावात प्रबुद्ध संघातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चिंचवडगावात प्रबुद्ध संघातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चिंचवडगाव, ता. १५ : प्रबुद्ध संघाच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रबुद्ध संघाचे ज्येष्ठ सभासद व महानगरपालिका अधिकारी राष्ट्रपाल भोसले तसेच अशोक कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पवार यांनी उपस्थिती दर्शविली होती. राष्ट्रपाल भोसले, अशोक कदम, डॉ. धर्मेंद्र रामटेके, रंजना चेरेकर, प्रदिप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव किशन बलखंडे यांनी केली व आभार प्रदर्शन राजू वासनिक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक पवार, संजय कांबळे, दिंगबर घोडके यांनी परिश्रम केले.