न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा

रहाटणी, ता. १५ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूल रहाटणी. (New City Pride English Medium School) अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या प्रांगणातून शिवार चौक, शिवार चौक ते शाळा अशी प्रभात फेरी काढण्यात आली. “जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता कि जय, हर घर तिरंगा स्वतंत्रता का लगाओ नारा” अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

कॅप्टन साहिल बलोत्रा (औंध मिल्ट्री कॅम्प) याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी वसंत चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, रणजित बागल (नाईक) (औंध मिल्ट्री कॅम्प), सुरेश भालेराव (माजी पोलीस निरीक्षक), आर. डी. भालेराव (जेष्ठ नागरिक), सिमा शर्मा (वकील, पिंपळे सौदागर ), संजय सोनार, ट्रेजटर लायन महेंद्र परमार, लायन अंजुम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगने, अमोल घोलप, संतोष कापसे, शशी जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी सातवी आणि नवनीच्या विद्यार्थिनींनी देश भक्तिपर गीतावर नृत्य सादर केले. तसेच आठवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले. कॅप्टन साहिल बलोत्रा यांनी मार्गदर्शन केले व ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा साळवी यांनी केले, तर पाहुण्यांचे आभार रेणू वर्मा यांनी केले.