इंदुरीकर महाराजांवर इतका गदारोळ कशासाठी? तृप्ति देसाई! स्त्रीपुरुष समानता हवीच! पण भान सोडू नका!

इंदुरीकर महाराजांवर इतका गदारोळ कशासाठी? तृप्ति देसाई! स्त्रीपुरुष समानता हवीच! पण भान सोडू नका!

शीतल करदेकर

इंदुरीकर महाराजांबद्दल इतका गदारोळ कशासाठी?
असे विषय कोण का पेटवतं? स्त्रीपुरुष समानताहवीच, एकमेकांचा आदरही करायला हवा याची जाणीव स्त्रीसक्षमीकरणासाठी काम करणा-या बहुसंख्य महिलांना आहे. महिलांच्या हक्काची लढाई तृप्ती देसाई यांनी मंदिर प्रवेशापासून केली. त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्याही आपलं भान सोडू लागल्याचं दिसतंय! त्यानी चक्क मुख्यमंत्र्यांना कोंडण्याची भाषा केली. ही अयोग्य आहे. कारण विषय कोणता काय बोलतोय कुणाशी जोडतोय हे कळत नाही असं दिसतय.


देसाईबाईंचे कार्यक्रम आंदोलनं आणि त्यांची भूमिका संशयास्पद वाटण्याची चर्चा आहे. त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू म्हटलं अनेक आरोप केले.कशासाठी तर महाराज सम विषम तारीख,स्त्रीपुरुष संग या विषयी बोलले.यात स्त्रीचा अपमान व्हावं असं काय होतं? नंतर महाराजांच्या वादात इतर समर्थक घूसले, त्यांनी अभद्र भाषा वापरली.त्यांचेवर कारवाई व्ह्यला हवीच. पण त्याचबरोबर तृप्ती देसाई यांच्या भुमिकांची आणि वादंगांचीही तपासणीही व्हायला हवी. समाजस्वास्थ्य बिघडेल असे बोलणे लिहिणे छापणे गुन्हा आहे.


थेट मुख्यमंत्र्यांना कोंडू म्हणून धमकावणे हा गुन्हा आहे, काहीही कारण नसताना महाराजांच्या तोंडाला काळ फासू हे म्हणणं म्हणजे समाजात त्यांचेवर चिखलफेक करणेसारखंच आहे. स्त्रीपुरुष समानता अत्यावश्यक आहे आणि ती पुरुषांवर आक्रमण करुन मिळणार नाहीय.हे वास्तव आहे. क्रांती हवीच पण ते करताना बेभान उन्मत्तपणा आला तर ते समाजविघातकच ठरतं.हे नक्की! महाराजांबद्दल हा वादंग कशासाठी हा प्रश्न कुणाच्याही मनात सहज येणार नाही.कारण सध्या जे काही धुमाकुळ युट्यूब चँनल्स घालत आहेत ते पहाता काय खरं व काय खोटं याची शहानिशा करण्याच्या मनःस्थितीत कुणीच नाही.


समाजमाध्यमांचं वाढतं वर्चस्व आणि युट्युब चँनल्सना लाईक्सवर मिळणारा मोठ्ठा पैसा यांचं अंकगणितही कुणीतरी गंभीरपणे लक्षात घ्यायला हवे.
चँनल्सवरच्या रोजच्या चर्चा याही या युट्युबवाल्यासमोर फिक्या पडल्यात.
इंदुरीकर महाराज सम व विषम दिवस स्त्रीपूरुष संगाबद्दल जे बोलले हे कोणत्या धर्माचा किंवा राजकारणाचा विषय नाही की त्याहुनही पुढे जाउन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही विषय नाही. पण कोणत्याही विषयाची तोडमरोड करुन वाद निर्माण करणं,त्यावर इच्छा नसेल तरी सर्वांना बोलायला लावणे ही या लोकांची व्यूहरचना! जरा फेसबुक, युट्युबवर जाऊन पहा…शीर्षक भयंकर असतं आणि त्याचा काहीच पत्ता त्या विडियोत नसतो..लोकांना फसवणं आणि वादं रंगवत ठेवणं यावर यांचं पोटपाणी तट्ट भरत असतं!


असो तर डाँक्टरांनी तपासलं कि जे औषध देतात ते विश्वासाने आपण खातो,बरं होणार हा विश्वास या औषधाला बळ देतोच.हे डाँक्टरही मान्य करतात.
आपल्या पुर्वजांनी,ऋषीमुनींनी अनेक विषयांवर संशोधन अभ्यास करुन ग्रंथ लिहिले,आयुर्वेद तर जगभरात प्रसिद्ध! शरिर रचना होणारे बदल आणि स्त्रीपुरुष गुणसूत्र विशिष्ट पद्धतीने एकत्र आल्यावर मुलगा की मुलगी होणार हे नक्की होतं.हे शास्त्र!
आपल्या अनेक ग्रंथात शारीर बदल,आंतर्गत रचना आणि मुलं होण्याचे प्रक्रियेबाबत लिखाण आहे,ते त्यांनी केलेल्या अभ्यासातूनच.मात्र आपल्या अभ्यासाला विद्वतेला कमी लेखून मागे टाकण्याचे काम नियोजनबद्ध होत आलंय. इंदुरकर महाराज मागील २५/२६ वर्ष हे जनजागृतीचे काम परखडपणे करताना दिसतात! तरुणाईचे प्रबोधन करतात.कुटुंब एकसंघतेचे,दारूविरोधी प्रबोधन जोरदार करतात. बोलण्याच्या ओघात सम व विषम स्त्रीपुरुष संग त्यावरून मुलगा की मुलगी यावर बोलले!
झालं मिडियावर हे वाक्य आलं आणि चमकलं!
का आणि कशासाठी?

महाराष्ट्रात जगण्यासाठी अनेक प्रश्न आहेत.सरकारने शिस्तित काम करण्याचे विषय आहेत.पण नाही कधी नाही तो तीन वेगळ्या विचारांचे सरकार आलंय…त्यात हा मनुवादाचा,पुरोगामित्वाचा विषय म्हणून पुढे आला. मूळात पुरोगामीत्व,मनुवाद स्त्रीवाद,समानता…हे सर्व वादी फक्त वाद घालून आपल्या पोळ्या शेकण्यासाठी असतात हे प्रकाशाइतकं लख्ख आहे. इंदुरीकर महाराजांनी आपल्या लोकांना शांतीचं आवाहन केलं…पण तिथेही पेटवणारे घुसले…प्रचंड आक्रमक स्त्रीवादी तृप्ती देसाईना अश्लिल भाषेत विरोध केला…आता विषय पूर्ण राजकीय झाला. मुळात कोणतेही विचारांचे असोत स्त्रीबद्दल अभद्र बोलणारे वागणारे लिहिणारे यांचेवर कोणतीही तक्रार करणेची वाट न पहाता टिपून कारवाई झाली पाहिजे,हे सायबरसेलचे काम!
पण आमची देशभरातील ही यंत्रणा अद्यापही महिलांविषयी तितकिशी अलर्ट नाही हे सत्य!
तर इंदुरीकर महाराज काय,सध्याचे काळात ज्यांना आपण वंदनीय मानतो असे महनीय सुधारक आणि विद्वान जरी आता असते तरी , त्यांचे विचारांवर बोलण्यावर पिसाटलेल्या या दुकानांनी आकांडतांडव करत राजकीय व सामाजिक रणकंदन माजवलं असतं. सध्याचा काळ कठीण आहे बाह्य शत्रुंपेक्षा जनतेच्या मनात हे विष पसरवणारे लोकच भयंकर आहेत! यावर कुठेतरी नियंत्रण येण्याची गरज आहे.
खाजगीतील लैगिकतेबाबतचे विषय फेसबुक व युट्युबवर चघळत पहाणारेंची संख्या मोठी आहेत .ते पाहून पोरं बिघडत आहेत ;याने विकृती वाढतेय यावर कठोर नियंत्रणाची गरज आहे.


महाराज काय अपमानकारक बोलले,स्त्री सन्मानाला धक्का कुठे बसला हा संशोधनाचा विषय आहे.
पण हे असे विषय वाजवत ठेवणेसाठी, पैसा देणारे गुप्त हात कुणाचे हे शोधले पाहिजे. पांचकळटुकार विनोद, कशाचाहीक्षधरबंद नसलेले टिकटाँक आदींचा समाजमनावर आणि वादग्रस्त विधानांचा वाढता बाजार भारतीय राजकारणावर परिणाम करतोय असं दिसून येतंय. देशाचे राज्याचे विकासाचे विषय बाजूला पडत आहेत. ही गंभीर बाब आहे.याकडे लक्ष द्यायला हवं.

इंदुरकर महाराज काही चुकीचं अशास्त्रीय,अंधश्रद्धा वाढवणारे,लोकविघातक बोलले आहेत हे कधीही कुणीही सिद्ध करू शकत नाहीत. तरीही या विषयाचा वेगळा आखाडा, बाजार मात्र का लागला हे शोधायला हवंय. राजकीय नेत्यांनी अशा विषयात वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. महाराजांनीही समाजाला उपदेश देताना हा समाज कसा घातक असतो याचा विचार करुनच बोलायला हवंय…तुकाराम महाराजांना वैकुंठी नेणारा,ज्ञानराजाला समाधीसाठी परिस्थिती निर्माण करणारा समाज हा आपलाच!मरणानंतर देवत्व महानता देणाराही समाज आपलाच!
चेहरे बदलले पण भूमिका त्याच आहेत!


मागे डान्सबार बंदिचे वेळी बारवाल्यांचा नेता शेट्टी , मंत्र्यांच्या कुटुंबियांना घराबाहेर फिरू देणार नाही अशा प्रकारचे बरळला होता. तेव्हा त्याला जेलची हवा खावी लागली होती. थेट मुख्यमंत्र्यांना कोंडून ठेवण्याची भाषा जर कुणी करत असेल तर ती बाई आहे म्हणून सत्कार करणार काय? हा सवाल आहेच!! इंदुरीकर महाराजांनी माफी मागितली!देसाईबाई माफी म्गगणार की या विषयाला आणखी भडकवणार ते पहायचं!

(लेखिका कोणतीही …वादी नाही.मानवता,समानता महत्त्वाची मानणारी आहे.)
शीतल करदेकर
7021616645