एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग आणि आय.क्यु.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “न्यू होरायझनस ऑफ न्यानोसायन्स अँड एनर्जी रिसोर्सेस” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नामांकित संशोधक डॉ. न्यूएन स्ट्रॉंग कोरिया, डॉ. लीन न्यूएन युके ,डॉ. मोहशीन तांबोळी कोरिया, डॉ. जी.बी. कोळेकर कोल्हापूर ,आदी मान्यवरानी मोलाचे मार्गदर्शन केले.

या परिषदेमधील मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी केले. या परिषदेचे उदघाटन सि-नेट पुणेचे प्रमुख डॉ. भारत काळे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी ऊर्जा, त्याचे संशोधन, अडचणी, त्यावरचे उपाय व भविष्यातील संधी यावर विचार व्यक्त केले. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉ. निषाद देशपांडे आय.टी. सूरत यांनी भूषविले. या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधकांनी भाग घेतला. डॉ. ग्यूएन स्ट्रॉंग कोरिया, मोहनसिंग तांबोळी कोरिया, डॉ.गोविंद कोळेकर कोल्हापूर, डॉ. लीन ग्यूयेन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. स्ट्रॉंग यांनी हायड्रोजन फ्युएलमार्फत, सेलमार्फत केल्या जाणाऱ्या ऊर्जानिर्मितीबद्दल अत्यंत मोलाची माहिती दिली. डॉ.तांबोळी यांनी न्यानो मटेरियलचा ऊर्जा साठविण्यासाठी कसा उपयोग होतो ? याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ डॉ. प्रमोद माहुलीकर जळगाव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ. वैशाली शिंदे यांनी या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्या म्हणाल्या की, संशोधकाने समाजहितासाठी संशोधन करावे. असे मार्गदर्शन केले .या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. मल्हारी रास्ते, संयोजक डॉ. रंजना जाधव, आयोजक डॉ. गजानन वाघ, आय.क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे यांचे योगदान मोलाचे ठरले .या परिषदेमध्ये अनेक विद्यार्थी संशोधक प्राध्यापक यांनी अतिशय सुंदर ओरल प्रेझेन्टेशन व पोस्टर प्रेझेन्टेशनमध्ये आपला सहभाग नोंदवून ही परिषद यशस्वी केली. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. गजानन वाघ यांनी आभार मानले.