महागाईवर हल्ला चढवूया, मोदी सरकारला जाब विचारूया ; युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीव्र आंदोलनास उपस्थित रहा – इमरान शेख

महागाईवर हल्ला चढवूया, मोदी सरकारला जाब विचारूया ; युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीव्र आंदोलनास उपस्थित रहा - इमरान शेख

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : भाजपवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे आणि याच महागाईच्या, मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उद्या (दि. २ एप्रिल) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य समन्वयक योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली “महागाईवर हल्ला चढवू या मोदी सरकारला जाब विचारूया” असे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केले आहे.

पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील नवीन चौपाटी, पेट्रोल पंप ते आचार्य अत्रे रंगमंदिर असा मोर्चाचा मार्ग असणार असून सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे.

इम्रान शेख म्हणाले की, “भडकलेल्या महागाईने त्रासलेल्या जनतेचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून, मोदी सरकार नको त्या मुद्द्याला महत्त्व देऊन जनतेच्या प्रश्नांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाईने अति उच्चांक गाठलेला असून कधी नव्हे, एवढी जनता त्रस्त आहे. यावर कुणी बोलायला तयार नाही. मोदी सरकारचे मंत्री वायफट बोलण्यामध्ये पटाईत आहेत.