लोकमराठी : चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणू संदर्भात विलगीकरण (क्वॉरंटाइन) हा शब्द सातत्याने वापरला जात आहे. अनेकांच्या मनात विलगीकरण म्हणजे काय, याबाबत शंका असते. मात्र, महाराष्ट्र शासनाने सरळ सोप्या मराठी भाषेत विलगीकरणाबाबत सविस्तर माहिती प्रसारीत केली आहे.
संशयित व्यक्ती कोण असू शकतो?
- तीव्र श्वसनाचा आजार असलेला कोणताही व्यक्ती {ज्याला ताप व श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्याचे किमान एक लक्षण (खोकला, श्वास घेण्यास त्रास)
- कोविड-१९ आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी १४ दिवसादरम्यान राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित देशातून / भागातून प्रवास केला असेल तर ती व्यक्ती संशयित ठरू शकते.
- कोविड-१९ आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी १४ दिवसादरम्यान जर श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या व निदान झालेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर ती व्यक्ती संशयित ठरू शकते.
- तीव्र श्वसनाचा आजार असलेला कोणताही व्यक्ती {ज्याला ताप व श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्याचे किमान एक लक्षण (खोकला, श्वास घेण्यास त्रास)} आणि त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
- कोविड-१९ आजाराची केलेली तपासणी अपवादात्मक ठरली असेल प्रयोगशाळेमार्फत निदान केलेली व्यक्ती.
- वैद्यकीय चिन्हे आणि लक्षणांच्या आधारे प्रयोगशाळेमार्फत एखाद्या व्यक्तीला कोविड-१९ ची बाधा झाल्याचे निदान केल्यानंतर
घरात सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?
- इतरांपासून दूर रहा
- वेगळ्या खोलीत रहा आणि घरातील इतर लोकांपासून दूर रहा. कमीतकमी १ मीटर इतके अंतर राखा; जेणेकरून घरातील इतर लोक संक्रमणापासून सुरक्षित राहतील.
- उपलब्ध असल्यास, स्वतंत्र शौचालयाचा वापर करा.
- आरोग्याची काळजी घ्या आणि सूचित करा
- ताप, कोरडा खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असल्यास, इतरांच्या संरक्षणासाठी मास्कचा वापर करा
- त्वरित आपल्या जवळच्या आरोग्य सुविधा किंवा आशा किंवा एएनएम यांच्याशी संपर्क साधा.
- मास्कचा वापर
- जेव्हा आपण इतर लोकांच्या आसपास असता आणि आपण आरोग्य केंद्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी.
- जेव्हा आजारी व्यक्तीस मास्क घालण्यास अडचण निर्माण होत असेल तेव्हा इतर कुटुंबातील सदस्यांनी खोलीत प्रवेश करण्यापूर्वी मास्क घालावा.
- सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
- कामावर, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका.
- आपण बाधित असल्यास, आपली बाधा इतरांना देखील होऊ शकते.
- घरी येणारे अभ्यागत किंवा सहाय्यक कर्मचारी यांच्याशी संपर्क टाळा
- आपल्याला देखील नकळत ही बाधा होऊ शकते.
- सहाय्यक कर्मचाऱ्यांना दूर राहण्यास सांगितले पाहिजे.
कौटुंबिक सदस्यांनी होम क्वॉरंटाइनचे समर्थन कसे करावे?
- वारंवार आपले हाथ साबण व पाणी वापरून स्वच्छ धुवा.
- वृद्धांपासून दूर रहा त्यांना बाधा होण्याची अधिक शक्यता असते.
- घरातील सदस्यांनी जेवढे शक्य असेल तेवढे रुग्णाला दुसऱ्या खोलीत ठेवावे आणि नजीकचा संपर्क टाळावा.
- उपलब्ध असल्यास, घरातील सदस्यांनी स्वतंत्र खोली आणि स्नानगृह वापरावे.
- घरगुती वस्तू बाधित व्यक्तीसह शेअर करणे टाळा उदा. डिश, पिण्याचे ग्लास, कप, भांडी, टॉवेल्स इत्यादी वस्तू.
- बाधित व्यक्तीच्या संपर्कात असताना नेहमीच तिहेरी स्तरीय मास्क वापरावा. विल्हेवाट लावण्यायोग्य मास्क पुन्हा कधीही वापरता येणार नाहीत. (वापरलेला मास्क संभाव्यतः दूषित मानला जावा) सुरक्षितपणे मास्कची विल्हेवाट करावी.
- जर लक्षणे आढळून (ताप / कोरडा खोकला / श्वास घेण्यास त्रास) आल्यास त्याने / तिने त्वरित आपल्या जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
(संदर्भ : mahainfocorona.in)