अनोखा उपक्रम राबवीत कुंदाताई भिसेंनी जिंकून घेतली अनेकांची मनं..

अनोखा उपक्रम राबवीत कुंदाताई भिसेंनी जिंकून घेतली अनेकांची मनं..
  • जवान आणि पोलिसांना मंगलमय पर्वावर राख्या बांधून दिली मानवंदना…

पिंपरी, ता. ११ : भावा-बहिणीच्या सुंदर नात्याला अधिक घट्ट विणणारा सण म्हणजे रक्षाबंधन. याच नात्याची वीण घट्ट करण्यासाठी भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी अनोखा उपक्रम राबवीत अनेकांची मनं जिकून घेतली. स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन या दुहेरी मंगलमय पर्वावर अहोरात्र देशाची आणि शहराची सुरक्षा करणारे जवान आणि पोलिसांना राखी बांधून मानवंदना दिली.

पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटीत कुंदाताई भिसे यांनी सैनिकांना राख्या बांधल्या. त्यानंतर पिंपळे सौदागर पोलीस चौकी, सांगवी पोलीस चौकी आणि औंध वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी सांगवी पोलीस ठाण्यातील अधिकारी टोणपे, सांगवी वाहतूक विभागातील प्रसाद गोकुळ आणि रक्षकमधील लष्करी अधिकारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, ब्रह्मा कुमारी इश्वरीय विश्व विद्यालयातील पदाधिकारी, आनंद हास्य योगा क्लब आणि उन्नती सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्या उपस्थित होत्या

कुदाताई भिसे प्रास्ताविक करताना म्हणाल्या, राखी हा केवळ रेशमाचा धागा नसून ती दोन पवित्र अतूट नात्याचे प्रतीक आहे. भाऊ आपल्या बहिणीला रक्षा करण्याचे वचन देतो. हा राखीचा धागा हा त्या वचनाची आठवण करून देणारा आहे. आज देशाच्या बाह्य रक्षणासाठी सैनिक आणि देशांतर्गत रक्षणासाठी पोलिस हे दोन्ही रक्षणकर्ते बांधव महान कार्य करीत आहेत. आपल्या आयुष्यातील तारुण्य व उमेदीचा काळ जवान आणि पोलिस देशाच्या रक्षणासाठी देत आहेत. त्यांना आज राखी बांधून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न केला.

दरम्यान पोलीस आणि जवान यांचा सन्मान करतेवेळी भावनिक होत दोघांनीही कुंदाताईंचे आभार मानले.